तंझानिया मध्ये गुडीपाड्व्या निमित्त नवीन वर्षाचे स्वागत दण्क्यात साजरा

तंझानिया मध्ये गुडीपाड्व्या निमित्त नवीन वर्षाचे स्वागत दण्क्यात साजरा

दि. २ एप्रिल, २०२२  

गुडीपाडवा हा मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस...
नवीन वर्ष म्हणजे सर्व दुःख विसरून वाईट अनुभव मागे टाकून आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देण्याचा दिवस..
दार-ए-सलाम, टांझानिया मधील महाराष्ट्र मंडळा तर्फे हा दिवस खुप जोशात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. आपल्या भारतापासून दूर राहूनही आपली संस्कृती आणि परंपरा न विसरलेल्या मराठी बंधू आणि भगिनींनसोबत हा सोहळा पार पडला. मंडाळाचे अध्यक्ष श्री. संभाजी पाटील ह्यांनी ह्या कार्यक्रमाची सुरुवात केली. टांझानिया व भारतामधील सुप्रसिद्ध गायिका सौ. गौरांगी भंडारे ह्यांनी या कार्यक्रमाचे उत्तम  सुत्र संचालन करुन प्रेक्षकांना आपलंस करुन घेतलं. भारतीय संस्कृती प्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात विशेष अतिथी जग पुनीत मालवाह्तुक जहाजाचे दल प्रमुख कॅप्टन श्री. शरद विश्वकर्मा आणि मुख्य अभियंता श्री मनोज नलावडे ह्यांनी दीप प्रज्वलित करुन केले तसेच कमिटीतल्या महिलांनी गुढीचे पूजनही केले. जग पुनीत हे जहाज दुबईहून ९० दिवासांचा पल्ला पार करुन दार-ए-सलाम च्या बेटा वर काही दिवस विश्रांती साठी थांबले होते. आपलं घर आणि परिवारापासून ऐवढे दिवस लांब असलेल्या ह्या लोकांना महाराष्ट्र मंडाळाच्या कार्यकर्त्यांनी आपुलकी व प्रेमाने  ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. दोन्ही उपस्थित पाहुण्यांनी आपले व जहाजाचे अनुभव सर्व प्रेक्षकांसोबत शेअर केले.
कुमारीअदिती सुयोग बुटाला हिने आपल्या स्वरचित मेरा हिंदुस्तान ह्या कवितेने कार्यक्रमाची सुरुवात केली. अतिशय सुरेख शब्द रचना आणि विशेष अर्थ असलेल्या ह्या चिमुकलीच्या कवितेने प्रेक्षक भारावून गेले, टाळ्यांच्या कडकडाटाने तिचे कौतुक करण्यात आले.
कुमार प्रगन्य निलेश आपोतीकर, कुमार शार्दुल सचिन वानखेडे आणि कुमार शौर्य राहुल क्षीरसागर ह्यांनी मल्हारी ह्या हिंदी गाण्यावर डांस करून पूर्ण सभागृह दणाणून सोडला. शाळेत परिक्षेच्या अभ्यासाची वेळ चालू असताना सुद्धा हे बाल कलाकार आणि त्यांच्या आईंनी जी मेहेनत घेतली ती खरच खूप कौतुकास्पद होती. त्यानंतर श्री सुर्यकांत सुतारसूर्या’ ह्यांनी आपल्या सुंदर सुंदर कविता सादर करुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
महाराष्ट्र मंडळाचे माजी अध्यक्ष श्री जयंत वाठोरे ह्यांनी त्यांचे मंडळाशी असलेले नाते याचा उल्लेख आपल्या प्रोत्साहित शब्दात केला, मंडाळाच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा देत भविष्यात होण्याऱ्या सर्व कार्यक्रमांच्या बाबतीत आपला सदैव पाठींबा राहिल असं आश्वासन ही दिलं. त्यानतंर आपल्या सुमधुर आवाजामध्ये एक गाणं ही गायलं. प्रेक्षकांनी ही त्याना जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.                     त्या नंतर सौ. गौरांगी भंडारे ह्यांच्या मार्गदर्शना खाली  तालावरुन गाण्याला ओळखणे, म्हणीचे अर्थ सांगून म्हणी ओळखणे असे अनेक कार्यक्रम झाले व सर्व उपस्थित मंडळीनी कार्यक्रमात सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

नेहमी प्रमाणे कार्यक्रमाच्या शेवटी ‘हौजी’ हा खेळ खूप रंगला

, करमणूकीसाठी आणि आपल्यातल बालपण जिवंत ठेवण्यासाठी ह्या कार्यक्रमात जवळ जवळ ९० जणांनी सहभाग घेतला. महिलांमध्ये आणि पुरुषांमधे जोरदार चुरस चालू असताना शेवटी श्री गणेश गाजरे पाटील आणि सौ. नेहा नितीन वाघमारे या दोघांनी फुल्ल हौजीच बक्षिस पटकावलं त्यात त्यांना हॉटेल करम्बेजी येथील डिनर चे कूपन मिळाले. कार्यक्रमाची सांगता करण्याआधी  उपस्थित असलेल्या परिवारांकरिता एक लक्की ड्रॉ ठेवण्यात आला होता आणि त्यात एक रात्र व एक पूर्ण दिवस होटेल साउथ बीच मध्ये फ्री स्टे च कूपन होत. तर त्या कूपनचे मानकरी श्री व सौ. अरूणा अनिल चौधरी हे झाले. 
हा कार्यक्रम होटेल सफायर च्या रुफ टॉप-१०व्या मजल्या वर आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमा मध्ये उत्तम खाण्यापिण्याची व्यवस्था ही करण्यात आली होती. नवीन वर्षाचा दिवस आणि श्रीखंड पुरीचा बेत याने उपस्थितांना अगदी घरच्या जेवणाचा सुखद आनंद मिळवून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. गौरांगी आणि श्री संभाजी पाटिल यांनी सर्वांचे आभार व्यक्त करुन कार्यक्रमाची सांगता केली.

सूर्यकांत सुतार सूर्या

दार–ए-सलाम, तंजानिया, इस्ट अफ्रिका

ईमेल: surya.4675@gmail.com





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

डॉ. रामदरश मिश्र की साहित्यिक जीवन यात्रा

पुस्तक समीक्षा: मातृभूमि के लिए (काव्य संग्रह)- डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’