Posts

Showing posts from April, 2022

तंझानिया मध्ये गुडीपाड्व्या निमित्त नवीन वर्षाचे स्वागत दण्क्यात साजरा

Image
तंझानिया मध्ये गुडीपाड्व्या निमित्त नवीन वर्षाचे स्वागत दण्क्यात साजरा दि. २ एप्रिल , २०२२   गुडीपाडवा हा मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस... नवीन वर्ष म्हणजे सर्व दुःख विसरून वाईट अनुभव मागे टाकून आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देण्याचा दिवस.. दार-ए-सलाम , टांझानिया मधील महाराष्ट्र मंडळा तर्फे हा दिवस खुप जोशात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. आपल्या भारतापासून दूर राहूनही आपली संस्कृती आणि परंपरा न विसरलेल्या मराठी बंधू आणि भगिनींनसोबत हा सोहळा पार पडला. मंडाळाचे अध्यक्ष श्री. संभाजी पाटील ह्यांनी ह्या कार्यक्रमाची सुरुवात केली. टांझानिया व भारतामधील सुप्रसिद्ध गायिका सौ. गौरांगी भंडारे ह्यांनी या कार्यक्रमाचे उत्तम   सुत्र संचालन करुन प्रेक्षकांना आपलंस करुन घेतलं. भारतीय संस्कृती प्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात विशेष अतिथी  जग पुनीत  मालवाह्तुक जहाजाचे दल प्रमुख कॅप्टन श्री. शरद विश्वकर्मा आणि मुख्य अभियंता श्री मनोज नलावडे  ह्यांनी दीप प्रज्वलित करुन केले तसेच कमिटीतल्या महिलांनी गुढीचे पूजनही केले. जग पुनीत  हे जहाज दुबईहून ९...